*नाथ प्रतिष्ठानचा उद्या सोमवारी परळीत सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळा 75 वधु-वर होणार विवाहबध्द;*
_वधु-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी उपस्थित रहावे-ना.धनंजय मुंडे_
परळी वै.दि.16………………
नाथ प्रतिष्ठानच्या वतीने उद्या सोमवार दि.17 एप्रिल रोजी आयोजित सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळ्यात 75 गरिब कुटुंबातील मुला-मुलींचा विवाह संपन्न होणार आहे. परळी विधानसभा मतदारसंघातील गरिब कुटुंबातील या मुला-मुलींना शुभाशिर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नाथ प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंंडे यांनी केले आहे.
सायंकाळी 6 वाजुन 11 मिनीटांनी या गोरज मुहुर्तावर हा सोहळा वैद्यनाथ मंदिरा जवळील हालगे गार्डन येथे संपन्न होणार आहे. त्यापुर्वी सकाळी मुस्लिम समाजातील 1 तर बौध्द समाजातील 22 जोडप्यांचा विवाह सकाळी 10 वाजता त्यांच्या धर्माच्या प्रथेनुसार संपन्न होणार आहे. दुपारी विवाहास येणार्या वधु-वरांच्या वर्हाडी मंडळींची भोजन व्यवस्था करण्यात आली असुन, सायंकाळी मुख्य विवाह सोहळा संपन्न होणार आहे. त्यापुर्वी सर्व वरांची शहरातील मोंढा मार्केट येथील हनुमान मंदिरापासुन सजवलेल्या ट्रॅक्टर मधुन सवाद्य भव्य शेवंती मिरवणुक काढण्यात येणार आहे.
या सोहळ्यात विवाहबध्द होणार्या वधुस सोन्याचे मणिमंगळसुत्र, संसार उपयोगी भांड्यांचा सेट, वधु-वरांना कपडे, बुट, चप्पल आदी साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने दिले जाणार आहे.
प्रतिष्ठानचे हे विवाह सोहळ्याचे 11 वे वर्ष असुन आत्तापर्यंत अकराशेहुन अधिक मुलींचे कन्यादान करण्यात आलेले आहे. या सोहळ्याची हालगे गार्डन मैदानावर जय्यत तयारी करण्यात येत असुन, त्यासाठी भव्य मंडप, भोजनगृह, वर्हाडी मंडळींना थांबण्यासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. या तयारी साठी प्रतिष्ठानचे असंख्य कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत.
*ना.धनंजय मुुंडेंचे भावनिक आवाहन*
या सोहळ्याच्या पार्श्वभुमीवर ना.धनंजय मुंडे यांनी भावनिक आवाहन केले आहे. त्यात सातत्याने येणारा दुष्काळ, नापीकी, महागाई आणि कर्जबाजारी पणामुळे आज शेतकरी, सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे. वयात आलेल्या आपल्या मुला-मुलींचे विवाह कसे करावेत हे त्याच्या समोर संकट निर्माण झाले आहे. हुंडा देण्यासाठी पैसे नाहीत म्हणुन पालक आत्महत्या करीत आहेत. तर वडिलांना हुंड्याच्या त्रासामुळे लग्न करता येत नाही म्हणुन मुलीने आत्महत्या केल्याची कालची घटना अगदी ताजी आहे.
यामुळेच या गरिब शेतकरी, सर्व सामान्य माणसांना दिलासा देण्यासाठी, त्यांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा भार हलका करण्यासाठी आणि समाजाचे काही तरी देणे लागतो या सामाजिक भावनेतुन हा सोहळा होत असल्याचे म्हंटले आहे.
प्रतिष्ठानचे हे सामुदायीक विवाह सोहळ्याचे 11 वे वर्ष आहे. आज पर्यंतच्या विवाह सोहळ्याच्या माध्यमातुन अकराशे पेक्षा जास्त मुलींचे विवाह संपन्न झाले आहे. ही कुटुंब आज सुखाने नांदत आहेत. आज पर्यंतच्या सर्व उपक्रमात आपला सहभाग होता. आपल्या कुटुंबातील भगिणीचा विवाह समजुन उद्या होणार्या सामुदायीक विवाह सोहळ्यासही आपण आगत्य उपस्थित राहुन त्यांना शुभाशिर्वाद द्यावेत ही या भगिणींचा एक भाऊ म्हणुन माझी आपणास विनंती करित असल्याचे त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
—————————