मुख्य बातम्या

ना.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरु

ना.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरु

नाथ प्रतिष्ठानच्या सर्व धर्मीय सामुदायीक विवाह सोहळ्याची जय्यत तयारी; सोमवारी परळीत 72 जोडपी विवाह बंधनात.

 परळी वै. दि.10….विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. येत्या सोमवारी म्हणजेच 17 एप्रिल रोजी या सोहळ्याच्या माध्यमातुन 72 वधु-वर विवाह बंधनात बांधले जाणार आहेत._

मागील 11 वर्षापासुन नाथ प्रतिष्ठानच्या वतीने सामुदायीक विवाह सोहळ्याचा हा उपक्रम परळीत राबवल्या जातो. परळी विधानसभा मतदारसंघातील गोर-गरिब कुटुंबातील पालकांच्या मुला मुलींचा विवाहाचा भार हलका व्हावा यासाठी आयोजित या उपक्रमात आत्तापर्यंत एक हजारहुन अधिक मुला-मुलींचे कन्यादान प्रतिष्ठानच्या वतीने करून देण्यात आले आहे.

या वर्षीचा हा सोहळा सोमवार दि. *17 एप्रिल रोजी सायंकाळी गोरज मुहुर्तावर हालगे गार्डनच्या मैदानावर संपन्न होणार आहे.* या सोहळ्यासाठी *आत्तापर्यंत 72 वधु-वरांची नोंदणी पुर्ण झाली असुन,* यापुढे नोंदणाी स्विकारली जाणार नसल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने कळविण्यात आले आहे.

सोमवारी होणार्‍या या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत असुन हालगे गार्डन मैदानावर मंडप व स्टेज उभारण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे.

*वधु-वरांना लग्नाचे कपडे, बुट,चप्पल, वधुस सोन्याचे मनी मंगळसुत्र, संसार उपयोगी भांड्यांचा सेट आदींची खरेदी व इतर कामे प्रतिष्ठानच्या सदस्यांनी हाती घेतली आहेत.

* या सोहळ्यात सकाळी बौध्द व मुस्लिम समाजातील वधु-वरांचा विवाह त्यांच्या धार्मीक प्रथे प्रमाणे संपन्न होत असुन, सायंकाळी सर्व वधु-वरांचा एकत्रीत मुख्य विवाह सोहळा संपन्न होणार आहे. दुपारी वर्‍हाडी मंडळींच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली असुन, विवाहापुर्वी सर्व वरांची मोंढ्यातील हनुमान मंदिरापासुन ते विवाह स्थळापर्यंत भव्य शेवंती मिरवणुक काढण्यात येणार आहे.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे असंख्य कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. मतदारसंघातील गोर-गरिब व शेतकरी कुटुंबांना आधार देणारे हे कार्य आपल्या घरचेच कार्य आहे. असे समजुन वधु-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्यासंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ना.धनंजय मुंडे यांनी केले आहे.

———————-

ना.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरु
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top