मुख्य बातम्या

पंकजा मुंडेचे फक्त आश्वासनच … शाहिद कुटुंबीय….

महासत्ता :- पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात वीर मरण आलेले केळगाव येथील संदीप जाधव यांच्या वीर पत्नी उज्वला जाधव यांना
वैद्यनाथ बँकेत नोकरी देण्यात येईल. शिवाय त्यांच्या मुलीच्या आणि मुलाच्या नावाने प्रत्येकी एक-एक लाख रुपये बँकेत फिक्स करण्यात येतील.
देशसेवेसाठी केळगावातील २५ तरुण अहोरात्र सेवा करता त्यामुळे या गावातील तरुणांना ग्रामविकास खात्यातून २५ लाख रुपयाची भव्य व्यायाम शाळा उभारण्यात येईल. आश्वासनाच्या फैरी झाडत सांत्वन प्रसंगी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे बोलल्या होत्या.
प्रत्यक्षात मात्र भाजप सरकार प्रमाणे पंकजा मुंडे यांना हि दिलेल्या आश्वासनाचा विसर पडलेल्या असून वीर जाधव कुटुंबय मात्र आणखीन पण आश्वासनाच्या प्रतीक्षेत आहे. पंकजा मुंडे यांनी दिलेल्या एखाद्या तरी आश्वासनाची पूर्तता करायला हवी होती अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Most Popular

To Top