महाराष्ट्र

।। राजकीय कुरूक्षेञावरील धनंविजय ।।

विजय विरोधी नेतृत्वाच्या नकारात्मक मतातून नाही तर ना.धनंजयजी मुंडेसाहेबांच्या सकारात्मक कामाचा आहे !

 

विजय विरोधी नेतृत्वाच्या नकारात्मक मतातून नाही तर ना.धनंजयजी मुंडेसाहेबांच्या सकारात्मक कामाचा आहे !

ना.धनंजयजी मुंडेसाहेबांच्या नेतृत्वाखाली झालेल्या परळी नगरपरिषद ,पंचायत समीती,जिल्हापरिषद आणी नुकतीच झालेली बाजार समीतीची निवडणूक या सर्व निकालात ना.धनंजयजी मुंडे साहेबांना घवघवीत यश मिळवता आलं. परंतु या दैदिप्यमान यशाच जे विश्लेषण प्रसार माध्यमातून दाखवल जात आहे .त्याबद्दल एक पञकार म्हणून आणि ना.धनंजयजी मुंडेसाहेबांचा कार्यकर्ता म्हणून कांही गोष्टी खटकल्या त्या अशा की ,हा हॅट्रीक विजय हा केवळ विरोधी नेतृत्वाच्या अकार्यक्षमतेमुळेच प्राप्त झाला ..असेच चित्र माध्यमातून दाखवण्यात आलं .मला व्यक्तिशः
हीच बाब खटकली आहे . हा विजय केवळ ना.धनंजयजी मुंडेसाहेबांच्या एकाकी संघर्षाचा
आहे असेच मी मानतो . कारण लोकनेते ना.गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांच्या पासून वेगळं होवून स्वतःच्या अस्तित्वासाठी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेवुन धडपडत असतांनाच लोकनेते ना.गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांच अपघाती अकाली निधन .
अशा परिस्थितीत ना.धनंजयजी मुंडे यांना त्यांच्या वारसदास नेतृत्वाने भावनीक राजकारण करत ना.धनंजयजी मुंडें यांना समाजा समोर ते खलनायक असल्याचे चित्र उभं केलं ..त्यात वंजारा समाजात भाजपा पक्ष रक्तात भिणलेला .दुसरीकडं राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा ना.शरदचंद्रजी पवार साहेबांनी आमच्या टाळक्यावर नव नेतृत्व लादल म्हणून राष्ट्रवादी पक्षातील नाराज प्रस्तापीत नेतेमंडळी .
धनंजयजी मुंडे पुर्णतः चक्रव्ह्युवात सापडले होते .परंतु आपल्या कार्य कुशलतेने या सर्व संकटांचा सामना करत ना.धनंजयजी मुंडे हे या चक्र व्ह्युवातून बाहेर पडले .राष्ट्रवादी पक्षात आपले स्थान घट्ट करुन आपल्या समाजाच्या लोकांचा विश्वास संपादन करण्यात हे नेतृत्व यशस्वी होत गेलं आणि परळी मतदार संघातील सर्वच जातीपातीच्या मतदारांनी लोकनेत्यांचा खरा संघर्षशिल राजकीय वारसदास निर्विवाद स्विकारला . हे यश केवळ एक दोन वर्षात नाही प्राप्त झालं .यासाठी मागील वीस वर्षाची तपश्चर्या आहे .
* कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान साभांळणारा नेता .
नेता तोच मोठा होतो जो नेता सामान्य कार्यकर्त्यासाठी त्याच्या सुखदुःखात उभा रहातो .म्हणून सामान्य वाटणारे हे कार्यकर्ते त्या नेत्यासाठी असामान्य काम करत असतात .ना.धनंजयजी मुंडेसाहेबांची हीच बाब त्यांना राजकारणातील कुरूक्षेञात खरा धनंजय बनवत आहे . ही गोष्ट मी स्वतः अनुभवली आहे .माझ्या सारख्या अर्थ हीन ,मरळवाडी या लहान गावचा , ज्या गावात लोकशाही राज्यात ग्रामपंचात निवडणुकीत मतदानाच्या हक्का पासुन दुर रहावे लागतअसे अशा कार्यकर्त्यास परळी शहरात न मागता नगरपरिषदेची उमेदवारी दिली कुठल्याच राजकीय समीकरणात माझा विजय शक्य नव्हता .परंतू ना.धनंजयजी मुंडेसाहेब यांनी प्रचारात जणूकांही स्वतः च उमेदवार समजून पुर्ण ताकद लावुन मला निवडून आणलं आणि
न मागता सभापती पण केलं माझ्या तिन पिढीतही कोणी स्वप्न पाहिलं नव्हतं ते माझ्या नेत्यान प्रत्यक्ष करून दाखवल . असा मी एकटाच नाही माझ्या सारखे अनेक सामान्य कार्यकर्ते उभेकेले .
* सामाजिक जाणीव व विकासात्मक दृष्टि असणारा नेता .
ना.धनंजयजी मुंडेसाहेबांच्या यशाचे अनेक पैलू आहेत त्यातील एक म्हणजे हा नेता कोकणातल्या फणसा सारखा आहे वरून पहाता अतिशय कणखर व काटेरी दिसतो .परंतू आतून मात्र प्रचंड मृदु व हळव्या मनाचा आहे . या नेत्याने स्वतः चे लग्न अतिशय साध्या पध्दतीने केले .माञ बारा वर्षात मतदार संघातील गरीब बाराशे बहीणींचे कन्यादान मात्र राजेशाही थाटात करत आले आहेत .पुणे फेस्टीवल च्या धरतीवर गणेश महोत्सव .महापुरूषांच्या जयंत्या इत्यादी अनेक कार्यक्रम .आणी भावनिक राजकारनाला तिलांजली देऊन परळी नगरपरिषदेच्या माध्यमातून विकास गंगा प्रत्यक्ष परळीत आणली .
* लढाईत स्वतः उतरणारा नेता !
छञपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषकाचे गुपित काय होते ? तुलनेत मोगल सर्वच बाबतीत सक्षम होते . पण महाराजांनी मात्र मुठभर मावळ्यांच्या बळावर राज्य मिळवलं .
कारण मोगल हे लढाईत स्वतः उतरत नसतं ते सैन्य पाठवत असत .माञ शिवाजी महाराज लढाईत स्वतः उतरत असत हेच त्यांच्या यशाचे गुपित होय .
याप्रमाणेच हा नेता प्रत्येक निवडणूकीत स्वतः ला झोकून देतो . म्हणून यश पदरी पडत आहे .
मिञांनो एवढं सगळ यश मिळत असलं तरी आपला संघर्ष संपला नाही .2019 च्या विधान सभेत राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून येणारा नेता म्हणून आपला नेता असणार आहे त्या साठी अजुन जोमाने व जबाबदारी ने काम करण्यासाठी एकसंघ होऊन कामाला लागूया .

लेख
गोपाळ आंधळे
शिक्षण सभापती
न प परळी वैद्यनाथ.

।। राजकीय कुरूक्षेञावरील धनंविजय ।।
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top